Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

व्हीआयपी नंबर वाहन धारकांवर गुन्हे दाखल: आरटीओचे युजर आय.डी.हॅक करुन एजंटानी शासनाची केली ६७ लाखाची फसवणुक

team by team
June 29, 2022
in क्राईम
0
व्हीआयपी नंबर वाहन धारकांवर गुन्हे दाखल: आरटीओचे युजर आय.डी.हॅक करुन एजंटानी शासनाची केली ६७ लाखाची फसवणुक

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदूरबार येथे ऑनलाईन वाहन पोर्टलवरील आरटीओचे युजर आय.डी.हॅक करुन विविध कंपनीच्या विविध मॉडेलच्या ८३ गाडया व्ही.आय.पी.नंबरने रजिस्टर करून ६६ लाख ५९ लाख ९०० रुपयाची फसवणुक केली म्हणून सर्व वाहन चालक व इतर एजंट यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जानेवारी २०२२ ते आतापर्यंत सर्व वाहन धारक तसेच एजन्ट सलीम खान, ईमरान सैय्यद व इतर एजंट तसेच संबंधित व्यक्ती यांनी उप प्रादेशिक परीवहन कार्यालय वर नमुद विविध कंपनीच्या विविध मॉडेलच्या ८३ गाडया हया फिर्यादी जयसिंग चुडामण बागुल व त्याचे वरिष्ठ कांतीलाल अहिरे यांची ऑनलाईन वाहन पोर्टलवरील

युजर आय.डी हॅक करुन त्याचे कार्यालयातुन कोणालाही न देलेले आकर्षक / निवडक VIP वाहन क्रमांक वापरुन ते वर नमुद ८३ वाहनावर शासनाला कोणताही BMV टॅक्स न भरता ते वाहन रजिस्टर केल्याचे दाखवुन

तसेच वर नमुद वाहनाचे इंजिन नंबर किंवा चेसिस नंबरमध्ये खाडाखोड करुन तसेच आर सी बुकचे बनावटीकरण करुन शासनाची अंदाजित ६६ लाख ५९ हजार ९०० रुपयाची फसवणुक केली. तसेच फौजदारी पात्र कट रचला म्हणुन

जयसिंग चुडामण बागुल रा- स्वामी समर्थ नगर, नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून नंदूरबार शहर पोलिस ठाण्यात सर्व वाहन धारक तसेच एजंट सलीम खान रा. औरंगाबाद, एजंट ईमरान सैय्यद रा.तळोदा व इतर एंजट तसेच संबंधित व्यक्ती यांच्या विरुद्ध भादंवि क ४२० ४६५ ४६७ ४६८ १२० अ ३४ सह माहिती तंत्रज्ञान अधि ६६ , ६६ ( क ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान पुढील तपास स्था गु अशा नंदुरबार यांच्याकडे वर्ग केला आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यपालांनी दिले ठाकरे सरकारला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश, उद्या सायंकाळ 5 वाजेपर्यंत फैसला ?

Next Post

जिल्हा वार्षिंक योजनेचा निधी यंत्रणांनी विहित कालमर्यादेत खर्च करावा : पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांची विभागप्रमुखांना सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add