Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वीज पडून एकासह बैलाचा मृत्यू, वादळी वाऱ्यासह 7 घरांची पत्रे उडून झाले मोठे नुकसान

team by team
June 26, 2022
in कृषी
0
वीज पडून एकासह बैलाचा मृत्यू, वादळी वाऱ्यासह  7 घरांची पत्रे उडून झाले मोठे नुकसान

नंदुरबार l प्रतिनिधी

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शहादा तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर एक बैल ठार झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान नवापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे पाच ते सहा घरांचे पत्रे उडाले असून एक वीज रोहित्र कोसळले आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की,शहादा तालुक्यातील वडगाव शहाणा गावातील वन जमीन जंगल परिसरात शेतामध्ये झोपडी करून राहत असलेले दयाराम भिल (वय 54) रा. खेतिया यांच्या झोपडीजवळ वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यान तेथेच झोपडीजवळ बांधलेला एक बैल देखील विजेमुळे ठार झाला आहे.
दरम्यान नवापूर तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे देवळीपाडा निमदर्डा परिसरात विजेचा ट्रान्सफर कोसळून नुकसान झाले आहे.

तसेच देवळीपाडा पांढरफळी, निमदर्डा, सोनखांब, तिलासर या गावांमध्ये रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे. तसेच योगेश धर्मा गावित, वेल्जी काकडा गावित, निशार गावित राहणार सोंनखांब व शांत्या जेरमा गावित राहणार निमदर्डा,

या व्यतिरिक्त पाच ते सहा गावातील नागरिकांच्या घराचे पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे. महसूल विभागाने पाहणी करून काही ठिकाणी पंचनामे केले आहे, तर ज्या ठिकाणी पंचनामे झाले नसेल त्या ठिकाणी महसूल विभागाने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पावसाचा जून महिना संपत आला असला तरी नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्यांना सुरुवात झालेली नाही. ठराविक भागांमध्ये पाऊसाने हजेरी लावल्याने दिवसेंदिवस पेरण्या लांबत असल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

लोणखेडा येथे तिहेरी भीषण अपघात, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Next Post

महावितरणकडे पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध तब्बल ३३ लाख नवीन मीटर खरेदीची प्रक्रिया सुरु

Next Post
महावितरणकडे पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध तब्बल ३३ लाख नवीन मीटर खरेदीची प्रक्रिया सुरु

महावितरणकडे पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध तब्बल ३३ लाख नवीन मीटर खरेदीची प्रक्रिया सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add