नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील चौफुलीवर आज 11वाजेच्या सुमारास तिहेरी भीषण अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली.यावेळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.
प्राथमिक माहिती अशी की, प्रितमपुरहुन सुरत कडे जाणारी पिकप (क्र.MP-09-GG-7806) या गाडीत आईसरगाडीचे स्पेअर पार्ट घेऊन जात असताना गाडीने उभ्या असलेल्या योगेश गिरासे यांच्या मालकीच्या ॲपेरिक्षा (क्रमांक MH-39-L-9752) इला ठोस दिल्याने भीषण अपघात झाला.
त्यांनतर टाटा कंपनीची (MH-04-EL-7876) या गाडीला देखील मागून आईसर गाडीने ठोस दिल्याने अपघात झाला.यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी यात मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले आहे.यात ॲपेरिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.