Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अहमदाबाद,पुरीच्या धर्तीवर नंदनगरीत ५ जुलैला जगन्नाथ रथयात्रा, तयारीला आला वेग

team by team
June 25, 2022
in सामाजिक
0
अहमदाबाद,पुरीच्या धर्तीवर नंदनगरीत ५ जुलैला जगन्नाथ रथयात्रा, तयारीला आला वेग

नंदुरबार l प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या इस्कॉन तर्फे जगन्नाथ रथयात्रेचे ५ जुलैला आयोजन करण्यात आले आहे. नंदनगरीत प्रथमच जगन्नाथ रथयात्रा निघणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाविकांकडून तयारीला वेग दिला जात आहे.

इस्कॉनतर्फे अहमदाबाद, पुरी या सारख्या मोठ्या शहरांमध्ये जगन्नाथ रथयात्रा दरवर्षी काढण्यात येते त्याच धर्तीवर नंदुरबारात ५ जुलैला कृष्णभावनामृत संघाचे संस्थापक कृष्ण कृपामूर्ति श्रीमद् ए.सी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या प्रेरणेने रथयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. इस्कॉनच्या भाविक भक्तांकडून रथ यात्रेनिमित्त जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील दुर्गम अति दुर्गम भागापर्यंत भाविक ग्रामस्थांत पर्यंत पोहचून रथयात्रेची माहिती देत आहेत.

मंगळवार, दि. ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता शहरातील मोठा मंदिरापासून रथयात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे. देसाईपुरा पेट्रोल पंप, दो शाह तकीय, शिवाजी रोड,जळका बाजार, सोनार गल्ली, बालाजीवाडा, महाराष्ट्र व्यायाम शाळा हाटदरवाजा मार्गे तालुका पोलिस कवायत मैदानापर्यंत रथयात्रा काढण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता तालुका पोलीस मैदानावर रथयात्रा आल्यानंतर ७.३० वाजता कथा प्रवचनाच्या कार्यक्रम होईल.रात्री ८ वाजता महाप्रसाद वितरण करण्यात येईल.नंदूरबार शहरात प्रथमच जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात येत असल्यामुळे भाविक भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह संचारला आहे. इस्कॉन च्या भक्त मंडळचे कार्यकर्ते रथयात्रेच्या प्रचार व प्रसार करीत आहेत. नागरिकांनी रथयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन इस्कॉनचे प्रमुख भक्त सेवेकरी माधव श्यामसुंदर दास यांनी केले आहे.

सुरतहुन रथ येणार

इस्कॉनतर्फे दरवर्षी भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येते. अहमदाबाद, पुरी यांसारख्या मोठ्या शहरानंतर प्रथमच नंदनगरीत यात्रेचे आयोजन केले जात आहे. ३ जुलैला सुरतहून नंदुरबारात रथाचे आगमन होईल. रथाची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सलाम त्या विद्यार्थ्यांना : यकृत आजार ग्रस्त सहकारी विद्यार्थिनीच्या उपचारासाठी दोन दिवसात उभारले 49 हजार रुपये

Next Post

जेष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जेष्ठ नागरिक कक्षाची स्थापना: पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add