Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सलाम त्या विद्यार्थ्यांना : यकृत आजार ग्रस्त सहकारी विद्यार्थिनीच्या उपचारासाठी दोन दिवसात उभारले 49 हजार रुपये

team by team
June 25, 2022
in सामाजिक
0
सलाम त्या विद्यार्थ्यांना  :  यकृत आजार ग्रस्त सहकारी विद्यार्थिनीच्या उपचारासाठी दोन दिवसात उभारले 49 हजार रुपये

नंदुरबार l प्रतिनिधी
संवेदनशीलता व सहकार्यवृत्ती या संस्कारी मूल्यांना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवणे काळाची गरज झाली आहे. याच मानवी मूल्यांची जोपासना विद्यार्थी करीत असल्याचा सुंदर प्रत्यय श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिला.

आपल्यासोबत शिक्षण घेत वावरणाऱ्या एका विद्यार्थिनीला यकृताच्या जीवघेण्या आजाराचा सामना करावा लागत असताना तिच्या सर्वसामान्य जीवन जगत असलेल्या पालकांना विद्यार्थ्यांनी त्यांच्या खारीच्या वाट्यातून सुमारे 49 हजार रुपये अवघ्या दोन दिवसात गोळा करून कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापक सौ सुषमा शाह यांनी अत्यंत तन्मयतेने साथ दिली.

श्रॉफ हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली कु. हेतल कैलास कुंभार या विद्यार्थिनीची प्रकृती दहा दिवसांपूर्वी बिघडली. नंदुरबार येथील विविध रुग्णालयांमध्ये तिच्यावर तातडीने उपचार केल्यानंतर प्रकृती अधिकच खालावू लागली म्हणून तिला तातडीने धुळे येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. तेथे तिला यकृताचा आजार असल्याचे निदान झाले.

या उपचारासाठी महागडी औषधे व इतर वैद्यकीय सुविधांसाठी पालकांनी जवळ हवी तशी आर्थिक उपलब्धता नव्हती. आपल्या सोबत शिकणारी मैत्रीण अत्यवस्थ झाली आहे म्हणून तिच्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे हा निरोप कु.पायल राजपूत व कु.अक्षिता बेडसे या विद्यार्थिनींनी तिचे वर्गशिक्षक राजेंद्र मराठे यांना दिला.

शाळेच्या मुख्याध्यापक सौ.सुषमा शाह यांना विषयाची गंभीरता पोहोचल्यानंतर तत्काळ गरजूला उपचारासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या खारीच्या वाट्यातून आर्थिक मदतीचे आवाहन केले गेले.

याचा दृश्य परिणाम बघावयास मिळाला. या दोन दिवसात 49 हजार रुपये उपचार मदत निधी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उपलब्ध करून दिली. आपल्या सोबत शिक्षण घेत असलेली ही विद्यार्थिनी लवकर सुखरूप उपचार घेऊन घरी यावी यासाठी दयाशील सौजन्यशील वृत्ती विद्यार्थ्यांनी दाखवून दिली.

सदर कु.हेतल कैलाश कुंभार हिची आजी व काका यांना 49 हजार रुपये धनादेशाद्वारे मुख्याध्यापक सौ सौ सुषमा शाह यांनी प्रदान केले. यावेळेस उपमुख्याध्यापक राजेश शाह पर्यवेक्षक. विद्या सिसोदिया, जगदीश पाटील उपस्थित होते.

गरजू कुटुंबियांनी विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य कृतीबद्दल आशीर्वाद दिले. शाळे प्रति आभार प्रकट केले. हा उपक्रम राबविण्यासाठी राजेंद्र मराठे, केशव राजभोज, राहुल वडनेरे, वैभव पाटील, गिरीष चव्हाण यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

एसटी बसची दुचाकीला धडक, भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी

Next Post

अहमदाबाद,पुरीच्या धर्तीवर नंदनगरीत ५ जुलैला जगन्नाथ रथयात्रा, तयारीला आला वेग

Next Post
अहमदाबाद,पुरीच्या धर्तीवर नंदनगरीत ५ जुलैला जगन्नाथ रथयात्रा, तयारीला आला वेग

अहमदाबाद,पुरीच्या धर्तीवर नंदनगरीत ५ जुलैला जगन्नाथ रथयात्रा, तयारीला आला वेग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add