नंदुरबार ! प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास विभागाकडून शासन निर्णय दि. ३१ मार्च २००५ व १६ मार्च २०१६ अन्वये राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणेसाठी सन २०२१-२२ या वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ मिळणेसाठी तळोदा प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणेसाठी विहित नमुन्यातील आवेदन पत्र प्रकल्प कार्यालयातून शिष्यवृत्तीसाठी नमुना अर्ज प्राप्त करून परिपूर्ण माहिती भरुन व त्या सोबत आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करून तीन प्रतिसह सदर अर्ज प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा येथे दि.३१ आँगस्ट पर्यत सादर करावेत. तसेच अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता, अटी व शर्ती प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा या कार्यालयाच्या फलकावर उपलब्ध करून देण्यात आले आहे असे प्रकल्प अधिकारी डाँ.मैनाक घोष एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे.