नंदूरबार l प्रतिनिधी
वे. खा. भगिनी सेवा मंडळ संचलित कमला नेहरू कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नंदुरबार येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.व्ही.एन.पाटील उपस्थित होते ,कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे उपमुख्यध्यापक एस.एम.पाटील यांनी केली.
सूत्रसंचलन व योग मार्गदर्शन आर. डी. सोनवणे यांनी केले. शाळेतील सर्व विद्यार्थीनीनी चांगला प्रतिसाद दिला. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी कार्यक्रमाला उपस्थित होते.