नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात तब्बल तीन महिन्यांनी काल दि.२० जून रोजी कोरोनाचा रुग्ण आढळला होता.आज २१ जून रोजी पुन्हा एक कोरोनाचा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली.
नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी व कोरोनाचे नियम पाळावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे यांनी केले आहे.
पुणे येथून काल दि.२० जून रोजी नंदुरबारला आलेला एक जण आजारी पडला. त्याला असलेल्या लक्षणांवरुन कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान तळोदा येथील एकाचा आर. टी.पी.सी.आर अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे नंदूरबार जिल्ह्यात सध्याच्या घडीला दोन कोरोना रुग्ण आहेत नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी व कोरोनाचे नियम पाळावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे यांनी केले आहे.