नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मनरद येथे एकास मारहाण करीत जिवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील मनरद येथील तारु धारु माळचे यांच्या भावाची सून पळवून नेली या कारणावरुन पंच मंडळीत वाद मिटवित असतांना जयसिंग रुपा माळचे याने तारु माळचे यांना लाकडी डेंगाऱ्याने मारहाण केली.
तसेच दिलीप जयसिंग माळचे व राजू उत्तम माळचे यांनी हाताबुक्यांनी मारहाण करीत शिवीगाळ करीत दमदाटी केली. याबाबत तारु माळचे यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.जितेंद्र ईशी करीत आहेत.








