Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दामिनी ॲप शेतकऱ्यासाठी वरदान

team by team
June 19, 2022
in आरोग्य
0
‘दामिनी ’ॲपचा वापर करावा जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाच्या सूचना

नंदूरबार l प्रतिनिधी
सध्या मान्सूनचा कालावधी सुरू असून दरवर्षी मान्सून व मान्सूमपूर्व काळात आकाशात वीजेचा गडगडाट होवून विजा पडण्याचे प्रमाण जास्त असते. विज पडून मोठया प्रमाणात जीवीतहानी होवून अनेक शेतकरी, सामान्य नागरिक याला बळी पडतात. वीज पडून जीवीत हानी होवू नये,

यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालय, भारत सरकार दिल्ली यांनी दामिनी ॲप तयार केले आहे. दामिनी ॲप वीज पडण्याची पूर्व सूचना देते.

शेतकरी व नागरिकांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचविण्यासाठी या ॲपचा अवश्य वापर करावा. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी बांधवाना वीज पडण्यापूर्वी पंधरा मिनीट अगोदर हे वीज पडण्याचे संकेत तसेच विजांच्या गडगडाटाबरोबरच त्याचा वेग किती आहे

हे सुध्दा ॲपवर कळते. दामिनी ॲपच्या माध्यमातून याचा अंदाज वर्तविला जात असून अशा परिस्थितीत लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. म्हणजे सावध राहून जीवित व वित्तहानी वेळीच टाळता येते.

दामिनी ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व नागरिकांना तसेच शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी, कर्मचारी, गाव स्तरावरील सरपंच, पोलीस पाटील,

तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना दामिनी ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करावे. तसेच या ॲपचे जीपीएस लोकोशनचे काम करीत असून वीज पडण्याचा 15 मिनीटापूर्वी ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते.

ॲपमध्ये आपले सभोवतालच्या वीज पडत असल्यास ठिकाणापासून सुरक्षित स्थळी जावे. त्यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये. ग्रामीण भागातील सर्व नागरिक, शेतकरी, गुराखी, मेंढपाळ यांनी दामिनी ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. दामिनी ॲपमध्ये प्राप्त होणाऱ्या अर्लटनुसार आवश्यक पूर्वसूचना गावातील सर्व नागरिकांना देवून, होणारी जीवीत व वित्तहानी टाळावी.

मान्सून कालावधीत विशेषत: जून व जुलै या महिन्यात वीज पडून जीवीत हानी होते. जीवीतहानी होवू नये यासाठी नागरिकांनी व विशेषत: शेतकऱ्यांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी दामिनी ॲप अवश्य वापरावे. दामिनी ॲप शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

दोंदवाडा शिवारात वीज पडून शेत रखवालदारचा जागीच मृत्यू , एक जण जखमी

Next Post

सारंगखेडा मुक्कामी बस सुरू करण्याची नागरिकांची मागणी, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

Next Post
सारंगखेडा मुक्कामी बस सुरू करण्याची नागरिकांची मागणी, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

सारंगखेडा मुक्कामी बस सुरू करण्याची नागरिकांची मागणी, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add