Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोहरम साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन

team by team
August 12, 2021
in राज्य
0
नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पदभार स्विकारला
कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे मागील वर्षांपासून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात येत असल्याने इतर कार्यक्रमांप्रमाणेच या वर्षींचा मोहरम साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या अनुषंगाने नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
मोहरम महिन्याच्या नवव्या दिवशी म्हणजेच 18 ऑगस्ट 2021 रोजी ‘शहादत की रात’ तसेच दहाव्या दिवशी ‘ योम-ए-आशुरा’ हे 19 ऑगस्ट 2021 रोजी येत असून त्या निमित्ताने मातम मिरवणूका काढण्यात येतात. परंतू केंद्र व राज्य शासनाकडून सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सध्या बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूका काढता येणार नाही. खाजगी मातमदेखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम, दुखवटा करु नये.
वाझ, मजलीस हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत. ताजिया,आलम काढू नयेत. सबील, छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी कोविड संदर्भात आरोग्याच्या दृष्टीकोनातून नियमांचे तंतोतंत पालन करावे. सबिलच्या ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा.
सध्या लागू करण्यात आलेले ‘ब्रेक दि चेन’च्या  आदेशानुसार आणि त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार सर्व निर्बंध कायम लागू राहतील. त्यामध्ये मोहरम निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.
कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन आरोग्य पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगर पालिका, नगर पंचायत, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष मोहरम सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध  झाल्यास त्याचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

कॉंग्रेस गोरगरिबांचा विचार करणारा पक्ष: ॲड.सीमा वळवी

Next Post

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त पर्यटन संचालनालयामार्फत फोटोग्राफी स्पर्धा

Next Post

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त पर्यटन संचालनालयामार्फत फोटोग्राफी स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add