नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्द येथे शिक्षण अधिका़र्यांच्या उपस्थीतीत ढोल ताशे व लेझीमच्या पथकावर मीकी माऊसच्या सानिध्यात मुलांची गावातुन मिरवणुक काढुन,विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करून केक कापत शाळा प्रवेशाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्राथमिक माध्यमिक शाळा शासनाच्या निर्देशानुसार सुरू झाल्या असून पहिल्या दिवशी विद्यार्थी शाळा प्रवेशाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्द येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱी सतीश चौधरी यांच्या उपस्थीत विद्यार्थ्यांची गावातुन सजवलेल्या ट्रॅक्टरवर बसवून मिरवणुक काढण्यात आली. ढोल ताशे, मीकी माऊसच्या सानिध्यात मुलांनी लेझीम सादर केले त्यांनतर शाळा प्रवेशद्वारावर मुलांचे औक्षण करुन विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करीत शाळा प्रवेशाचा केक देखील कापण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्यातील १ हजार ७५५ शाळांमध्ये पहिले ते आठवीचे जवळपास २ लाख ३१ हजार ३६४ विद्यार्थी नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशित करण्यात आले आहे. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण व्हावे या उद्देशाने २०१७ पासून महाराष्ट्र शासनाने प्रवेश उत्सव साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत
त्यानुसार आज नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात शाळा प्रशासनाच्यावतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करून शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱी सतीश चौधरी यांनी सांगीतले.
योवळी ज्येष्ठ अधिव्याख्याता जिल्हा व शिक्षण प्रशिक्षण संस्था रमेश चौधरी, गटविकास अधिकारी सुवर्णा पवार ,गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, अधिव्याख्याता डायट सुभाष वसावे, साईनाथ वंजारी, शिक्षण विस्तारअधिकारी सचिन गोसावी,शिक्षण विस्तार अधिकारी शरद पाटील,
शिक्षण विस्तार अधिकारी जयंत चौरे, केंद्रप्रमुख वसंत पाटील. सरपंच अरविंद ठाकरे, उपसरपंच सागर साळुंखे,
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्र मराठे,,व्यवस्थापन समिती सदस्य गुलाब मराठे, मुख्याध्यापक राजेंद्र बागुल,न्यू इंग्लीश स्कुलचे मुख्याध्यापक राजेंद्र कदमबांडे , उपशिक्षिका मीना पाटील, उपशिक्षक निलेश चव्हाण. उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्पेश गोसावी.
अविनाश पाटील, हमिद खाटीक , प्रशांत पाटील, मुकेश पाटील, सोनल काकुस्ते, पुष्पा बागुल, कविता कदम, सुवर्णा पाटील सर्व अंगणवाडी सेविका मदतनिस यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. सूत्रसंचालन केंद्रप्रमुख वसंत पाटील यांनी केले तर आभार मुख्याध्यापक राजेंद्र बागुल यांनी मानले.