Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षणाधिकारी झालेत शैक्षणिक रथाचे सारथी

team by team
June 16, 2022
in शैक्षणिक
0
नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षणाधिकारी झालेत शैक्षणिक रथाचे सारथी

नंदूरबार l प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारी मुळे बंद असलेल्या शाळा आज उन्हाळी सुट्टीनंतर सुरू होत आहेत शासनाच्या आदेशानुसार पहिल्या दिवशी सर्वच नवागत विद्यार्थ्यांचे शाळेत वाजत-गाजत मिरवणूक काढत गुलाब पुष्प देऊन स्वागत होत असताना,

श्री.काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिर येथे शाळेच्या पहिल्या दिवशी आकर्षक घोडागाडी रथ व शाळेची बस सजवत विद्यार्थ्यांना बसवून ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत प्रवेशद्वारापर्यंत आणून गुलाब पुष्प देत मोठ्या आनंदी व उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

या शैक्षणिक रथाचे सारथी होण्याची संधी मला मिळाली ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे असे मत हिरा प्रतिष्ठान संचलित श्री.काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर व संस्कृती शिशु विहार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवागतांचे स्वागत व प्रवेशोत्सव समारंभप्रसंगी नंदुरबार जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.

पुढे ते म्हणाले, शाळेने पहिल्या दिवशी केलेले विद्यार्थ्यांचे स्वागत हे विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय असे आहे असेच नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये शाळेची गोडी व आवड उत्साह निर्माण होईल यासाठी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील राहावे अशी सदिच्छा व्यक्त केली व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित संस्थेच्या संचालिका सौ.अनिता शिरीष चौधरी यांनी आपल्या भाषणातून नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे सचिव तथा शाळेचे मुख्याध्यापक रुपेश चौधरी यांनी प्रास्ताविक सादर करत संस्थेच्या तसेच शाळेच्या माध्यमातून कोरोना काळात चालवलेले उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी शिक्षकांनी केलेले प्रयत्न व पुढील शैक्षणिक वर्षातील धोरण यांचा लेखाजोखा सादर करत शाळेच्या व संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रवेशोत्सव समारंभात विद्यार्थ्यांना सजवलेल्या घोडाच्या रथातुन व शाळेच्या बसमध्ये बसवून प्रवेशद्वारापर्यंत वाजत-गाजत आणण्यात आले तेथे मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत झाले.

शाळेचा पहिला दिवस मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे व शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी केक कापून शाळेचा पहिला दिवस मोठ्या आनंदात साजरा केला व सर्व विद्यार्थ्यांचे तोंड गोड व्हावे म्हणून केक वाटप करण्यात आला. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश काटके व आभार प्रदर्शन श्रीमती नयना सोनवणे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी युवराज भामरे, विशाल चौधरी, शेखर पाटील, रवी चौधरी, सुधाकर ठाकूर,चेतन वसईकर आदींनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

उमर्दे खुर्दे येथे शिक्षण अधिका़र्‍यांच्या उपस्थीतीत केक कापत शाळा प्रवेशाचा उत्सव साजरा

Next Post

सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकरी व लाभार्थ्यांनी फसव्या संकेतस्थळ व भ्रमणध्वनी पासून सावध रहा

Next Post
सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकरी व लाभार्थ्यांनी फसव्या संकेतस्थळ व भ्रमणध्वनी पासून सावध रहा

सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकरी व लाभार्थ्यांनी फसव्या संकेतस्थळ व भ्रमणध्वनी पासून सावध रहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add