नंदूरबार l प्रतिनिधी
मेष:- आर्थिक प्राप्ती चांगली होईल. नात्यातून लाभ होतील. प्रवासात त्रास होईल. वाहन जपून चालवा.
वृषभ:- जबाबदारी वाढेल. धावपळ होईल. आरोग्य सांभाळा. वाहने जपून चालवा.
मिथुन:- भ्रमंती घडेल. गैरसमज टाळा. जोडीदाराला विश्वासात घ्या. वादविवाद नकोत. भागीदारी व्यवसायात वितुष्ट निर्माण होऊ शकते.
कर्क:- सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. मात्र कामाचा ताण वाढेल. नोकरीच्या ठिकाणी वादविवाद संभवतात.
सिंह:- छंद जोपासाल. मुलांशी संवाद साधा. प्रेमात धोका संभवतो. क्रोध आवरा.
कन्या:- स्पर्धेत यश मिळेल. नात्यात कटुता येऊ देऊ नका. गृह कलह टाळा. जमीन व्यवहार जपून करा.
तुळ:- आर्थिक प्राप्ती चांगली होईल. गुंतवणूक वाढेल. संततीशी मतभेद संभवतात. आज भलते धाडस नको.
वृश्चिक:- विनाकारण शत्रुत्व होऊ शकते. उधार देणे टाळा. आर्थिक फसवणुकीची शक्यता आहे.
धनु:- आत्मविश्वास कमी होईल. अंतर्मुख व्हाल. प्रवासात त्रास जाणवेल. वाहन जपून चालवा.
मकर:- आरोग्य सांभाळा. खर्चात वाढ होईल. अधार्मिक कृत्ये होऊ देऊ नका. चोरीचे भय आहे.
कुंभ:- आर्थिक यश मिळेल. व्यवसायात वाढ होईल. येणी रेंगाळतील. व्यसने टाळा.
मीन:- आर्थिक फसवणूक होऊ शकते. सावध रहा. वरिष्ठ नाराज होतील. विनाकारण त्रास संभवतो.