नवापूर l प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर नवापुर शहरातील सरकारी दवाखान्याचे समोर अरहम इंन्फ्रा बिल्ड लिमीटेट कंपनीच्या चौपदरीकरणाच्या कामावर असलेल्या लोखंडी साहित्याची चोरी करणाऱ्या सात संशयित आरोपींना नवापूर पोलिसांनी अटक केली असून वाहनासह गुन्ह्यातील २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील समोरील अर्हम इन्फ्रा लिमिटेड हैदराबाद या कंपनीचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर सुरू असलेले बांधकामाचे साहित्य चोरीला गेले होते. याप्रकरणी हंसराज देवाराम मेघबन्सी यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी नवापुर पोलीसांनी २४ तासात चोरट्यांचा शोध घेत सात संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेले टाटा कंपनीच्या
(जी.जे, ०५ वाय.वाय ३३८८) वाहनासह पोलीसांनी गुन्ह्यातील २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय मनोज मोहीते रा.देवळफळी, नवापुर, पवन अरविंद पाडवी रा.लखानीपार्क नवापुर, बादल अरविंद पाडवी रा.लखानीपार्क नवापुर, अरुण महेंद्र गावीत रा. भोई गल्ली नवापुर, समीर बशीर शहा फकीर रा.देवळफळी नवापुर, गाडीमालक चालक शोहेब हुसनोद्दीन शेख रा. देवळफळी नवापुर, चोरीचा माल विकत घेणारा केय्युम कादीर शहा रा.लखानीपार्क नवापुर यांना
अटक केली आहे.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दादाभाई वाघ, विकास पाटील, नितीन नाईक, विनोद पराडके, संदीप सोनवणे अशांनी कारवाई केली.याप्रकरणी पुढील तपास पोहेका दादाभाई वाघ करीत आहेत.