तळोदा l प्रतिनिधी
भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. शशिकांत वाणी यांची भाजपच्या सुशासन आणि गरीब कल्याण कार्यक्रम समितीवर निवड करण्यात आली आहे.हि तीन सदस्यीय समिती असून राज्यस्तरावर कार्यरत असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारला ३० मे रोजी आठ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.या काळात त्यांनी देशाच्या प्रगतीचे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले असून भारताच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
तसेच अंतराच्या संकल्प देशातील गोरगरीब शोषित वंचित वर्गाच्या कल्याण कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सूचनेनुसार देशस्तरावर ‘८ साल : सेवा सुशासन और गरीब कल्याण लाभार्थी अभियान’ प्रारंभ करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्रातही विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात बूथ स्तरावर हा कल्याण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असून लाभार्थी अभियानाकरता प्रदेशाची तीन स्तरीय समिती खालील प्रमाणे गठित करण्यात आली आहे.
समितीत संयोजक अरविंद पाटील निलंगेकर सहसंयोजक बाळासाहेब थोरात व डॉ.शशिकांत वाणी यांचा समावेश करण्यात आलेला आहे.डॉ. वाणी यांना त्याबाबतचे पत्र प्रदेश उपाध्यक्ष तथा अभियानचे प्रदेश संयोजक जयप्रकाश ठाकूर यांचे पत्र प्राप्त झाले असून पत्रात आपण कार्यक्रमाचे योग्य नियोजन करावे.
तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्या कार्यक्रमात सहभाग करून सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी पार पाडावे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.डॉ.वाणी यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातून त्यांचें अभिनंदन करण्यात येत आहे.