नवापूर | प्रतिनिधी
नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे निषेधार्थ ५० ते ६० जणांनी जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश असतांना बेकायदेशीर जमाव नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध घोषणाबाजी जमवून केली .
याप्रकरणी हेकॉ नरेंद्र मानसिंग नाईक यांच्या फिर्यादीवरुन रिझान रा . जनता पार्क गल्ली अतीक सैय्यद नं . ६ नवापूर , सलाम मिरन बागवान , रा . शास्त्रीनगर नवापूर , आसीफ जुल्फेकार सैय्यद , रा . मुसलमान मोहल्ला , नवापूर , अनिशशाह रुबाब शाह रा . इस्लामपुरा , नवापूर ,
आदिलखान फिरोजखान पठाण रा . गढी परीसर , नवापूर , नशरु बाबु शाह रा . इस्लामपुरा नवापूर , जहांगिर
सलीम काकर रा . इस्लामपुरा नवापूर , उमर नरीम मन्सुरी रा . आंबेडकर पुतळया जवळ नवापूर , अबीद पेंटर , इम्रान पटवा रा.क्रिकेट ग्राऊंड नवापूर , बिस्मीला काकर , रा.इस्लामपुरा मज्जीद समोर नवापूर , समीर मुनाफ शाह , रा . नवापूर , जावीद रशीद शाह , यजू आयुब काकर , आयान पुर्ण नांव माहीत नाही , सलमान पूर्ण नांव माहीत नाही
तसेच इतर ५० ते ६० अनोळखी इसमांविरुद्ध भादंवि कलम १४३ , सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ ( १ ) ( ३ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई प्रविण कोळी करीत आहेत .