Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

न्यायालयाच्या आदेशाने नंदूरबार बसस्थानका समोरील महावितरणचे कार्यालय ३५ वर्षांनी करण्यात आले खाली

team by team
June 14, 2022
in क्राईम
0
न्यायालयाच्या आदेशाने नंदूरबार बसस्थानका समोरील महावितरणचे कार्यालय ३५ वर्षांनी करण्यात आले खाली

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथील बसस्थानकासमोर गेल्या ३५ वर्षापासून बेकायदेशीररित्या महावितरणाचा ताबा असलेल्या कार्यालयीन जागेवर न्यायालयाच्या आदेशाने कार्यालय खाली करण्याची नामुष्की ओढवली असुन सदर जागेच्या मालकाला ताबा मिळाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहरातील मुख्य रस्त्यावर बसस्थानक समोर व्यापारी मदनलाल जैन यांच्या मालकीची ४० हजार स्केअर फुट जागा १९३७ साली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी ५० वर्षाच्या कराराने भाडेतत्त्वावर दिली होती. ५० वर्षासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडून जागेचे मालक मदनलाल जैन यांना एका वर्षासाठी ३५१ रुपये भाडं असा करार करण्यात आला होता.

१९८७ साली सदर करार संपुष्टात आल्यानंतर जागेचे मालक मदनलाल जैन यांनी जागा खाली करून मिळावी अशी मागणी केली. महावितरण कंपनीच्या मुजोरी पणामुळे सदर जागा मालक मदनलाल जैन यांना परत न करता कार्यालयीन कामकाजासाठी वापरत राहिले.

दरम्यान २००० साली मदनलाल जैन यांनी जागेचा ताबा मिळावा यासाठी न्यायालयीन लढाई सुरू केली. २००६ साली दिवानी न्यायालयाचा निकाल मदनलाल जैन यांच्या बाजूने लागला. तरीदेखील महावितरण कंपनीने जागेचा ताबा दिला नाही. त्यानंतर सदर केस जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असताना २०११ साली जिल्हा सत्र न्यायालयाने देखील मालक मदनलाल जैन यांना ताबा मिळावा असा निकाल लागल्यानंतरही

महावितरण विभागाकडून ताबा देण्यात आलेला नव्हता. त्यानंतर मालक मदनलाल यांनी मुंबई खंडपीठ औरंगाबाद न्यायालयात धाव घेतल्यानंतर १५ नोव्हेंबर २०२१ रोजी हायकोर्टाने मालक मदनलाल जैन यांना ताबा मिळावा असा निकाल दिल्यानंतर महावितरण कंपनीला गेली आठ महिने वारंवार खाली करण्यास विनंती करून देखील जागेचा ताबा देत नसल्याने

आज दि.१४ जून रोजी अखेर मदनलाल जैन यांनी वकिलांचा व कोर्ट कर्मचार्‍यांचा फौजफाटा घेऊन येत महावितरण कार्यालय खाली करण्यास भाग पाडले आहे.

अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयातून अखेर सामान काढून खाली करण्यास सुरुवात झाली आहे. महावितरण विभागाचा मुजोरी पणा आणि निष्काळजीपणाला अखेर खंडपीठाने दणका दिल्यानंतर कर्मचारी वठणीवर आले आहे.

गेली ३५ वर्ष महावितरण कंपनीने जागेचे मालक मदनलाल जैन यांना भाड दिलेला नाही. भारतीय संविधानावर आणि न्याय व्यवस्थेवर मला पूर्ण विश्वास असल्याने मी न्यायालयीन लढा लढून माझ्या मालकीच्या जागेचा हक्क मिळविला असल्याची प्रतिक्रिया व्यापारी मदनलाल जैन यांनी दिली आहे.

सदर महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयातून नंदुरबार शहर व परिसरात वीज वितरणाचे काम चालत होते. त्यामुळे मोठ्या सामान अस्ताव्यस्त पडलेले आहे.

ऐरवी सामान्य नागरिक व कार्यालयांच्या वीज कनेक्शन कट करणार्‍या महावितरण कार्यालयावर आज व्यापारी मदनलाल जैन यांनी न्यायालयीन लढा देत वीज पाडली असल्याने शहरात एकच चर्चा आहे.

दुपारपासून कार्यकारी अभियंता संजय पाटील अतिरिक्त उपकार्यकारी अभियंत्या मनीषा कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांनी खाजगी वाहनांसह शासकीय वाहनांमध्ये सामान भरून नंदुरबार शहरातील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात घेऊन गेलेत.

सदर महावितरण कार्यालयाच्या बदलामुळे शहरी भागातील २८ हजार व ग्रामीण भागातील १५ हजार असे जवळपास पन्नास हजार ग्राहक वीज बिल भरणा व नवीन वीज कनेक्शन व तक्रारी यांची तारांबळ होणार आहे.

ग्राहकांसाठी काही सोय करण्यात येणार याबाबत विचारले असता वरिष्ठ नेत्यांनी बोलण्यातून स्पष्ट नकार दिला आहे.
दरम्यान विजवितरणच्या कार्यालयात वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या अनेक पत्रकारांना महावितरणच्या अधिकार्‍यांनी अरेरावेची भाषा वापरली. पत्रकारांवर अरेरावीची भाषा करणारे अधिकारी सामान्य नागरीकांशी कसे वागत असेल असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात दोन दिवसात ४७ मिमी पावसाची नोंद, पुढील आठवड्यात पावसाची शक्यता कमी, शेतकऱ्यांनी ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी : कृषि विज्ञान केंद्र

Next Post

विकास आणि वारसा दोन्ही सोबत पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्न हवेत : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Next Post
विकास आणि वारसा दोन्ही सोबत पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्न हवेत : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

विकास आणि वारसा दोन्ही सोबत पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्न हवेत : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add