नंदूरबार l प्रतिनिधी
निरीक्षक राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने नंदुरबार तालुक्यातील न्याहली शिवारात परराज्यातील मदयाची वाहतुक करतांना दहा चाकी कंटेनरसह १ कोटी १४ लाख ६८ हजार रू . किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि . १३ जून रोजी कांतीलाल उमाप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क,सुनिल चव्हाण संचालक ( अं व द ) राज्य उत्पादन शुल्क , विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, सी.बी. राजपुत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे , युवराज राठोड अधीक्षक , राज्य उत्पादन शुल्क , नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमीनुसार
दोंडाईचा ते नंदुरबार रस्ता न्याहली गावाजवळ नंदुरबार जि.नंदुरबार येथे टाटा कंपनीचा पॅक बॉडी असलेला कंटेनर ( क्र. MH – 46 – F – 4868) सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये रॉयल ब्ल्यु व्हिस्की १८० मि.ली. क्षमतेच्या एकुण १ लाख ३६८० पेट बाटल्या ( २१६० बॉक्स ) दिसुन आले.
तेथे वाहनासह संशयित आरोपी रोहित जालिंधर खंदारे रा . पोखरापुर खंदारे वस्ती ता . मोहोळ जि . सोलापुर, अविनाश मोहन दळवे रा.पोखरापुर पाण्याच्या टाकीजवळ ता . मोहोळ जि . सोलापुर या यांना अटक करण्यात आली असून कंटेनरसह एकुण १ कोटी १४ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा १ ९ ४ ९ अंतर्गत कलम ६५ ( अ ) ( ई ) , ८०,८१,८३ , ९ ० , ९ ८ ( २ ) , १०३१०८ अन्वये करण्यात आली . सदरची कार्यवाही डी . एम . चकोर निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार , पी . जे . मेहता दु . निरीक्षक, एस.एस. रावते दुय्यम निरीक्षक, पी . एस . पाटील दु.निरीक्षक
सोबत जवान सर्वश्री अविनाश पाटील , भुषण एम.चौधरी, हितेश जेठे , वाहन चालक हेमंत डी पाटील , राजेंद्र एन पावरा , एम.एम. पाडवी , संदीप वाघ , हर्षल आर नांद्रे इत्यादींनी यशस्वीरीत्या पार पाडली . सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी . जे . मेहता दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार हे करीत आहेत.