नंदूरबार l प्रतिनिधी
मेष:- दुपारनंतर आर्थिक लाभ चांगले होतील. व्यवसायात लक्ष घालावे लागेल. विक्री व्यवसायात यश मिळेल.
वृषभ:- पूर्वार्धात शुभ समाचार समजतील. संवादातून यश मिळेल. स्पर्धेत मागे राहू नका. संध्याकाळ विश्रांतीची.
मिथुन:- उत्तम धनप्राप्तीचे योग आहेत. महत्वाची कामे आज सकाळी पूर्ण करा. दीर्घकालीन फायद्याचे करार होतील.
कर्क:- कामात अडथळे येतील. भ्रमंती घडेल. निर्णय घेताना काळजी घ्या. संध्याकाळ नंतर अनुकूलता वाढीस लागेल.
सिंह:- शेतीची कामे मार्गी लागतील. आरोग्य सांभाळा. गृहकलह होऊ शकतात. वादविवाद टाळा.
कन्या:- सुखाची अनुभूती लाभेल. आर्थिक आवक चांगली होईल. ऐश्वर्य लाभेल. घरात काही बदल संभवतात.
तुळ:- खर्चात टाकणारा दिवस आहे. आर्थिक नियोजन चुकू शकते. महत्वाचे निर्णय संध्याकाळ नंतर घ्या.
वृश्चिक:- मन विचारात गढून जाईल. चुकीचे मार्गदर्शन मिळू शकते. विचारपूर्वक कृती करा. कलाकारांना यश मिळेल.
धनु:- दिवसाचा पूर्वार्ध संथ आहे. तेव्हा काळजीपूर्वक काम करा. खर्चात वाढ करणारा पूर्वार्ध आहे.
मकर:- उत्तम लाभाचा पूर्वार्ध आहे. येणी वसूल होतील. कर्जे मंजूर होतील. संध्याकाळ विश्रांतीची.
कुंभ:- संमिश्र असला तरी सुखाचा दिवस आहे. अध्यात्मिक आनंद मिळेल. नवीन कामे मिळतील.
मीन:- अचानक लाभाचा दिवस आहे. गुणवणूक करा. अंदाज अचूक येतील. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल.