म्हसावद l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी दि. 11 रोजी संध्याकाळी वादळवाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली होती . यावेळी जोरदार वाऱ्यामुळे आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ धडगाव संचलित देवमोगरा पुनर्वसन(मांडवा) अनुदानित आश्रमशाळेच्या इमारतीचे पत्रे उडून लाखोंचे नुकसान झाले.
देवमोगरा पू. ता अक्कलकुवा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चे प्रकल्पधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ मैनक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रकल्पधिकारी (शिक्षण ) एन एम साबळे , अनुदानित विभाग आस्थापना चे लिपिक राजेंद्र गोसावी, तलाठी एस एस वाघ, प्राथमिक मुख्याध्यापक डी एन गोसावी, माध्यमिक मुख्याध्यापक एम व्ही देसले, अधिक्षक दिपक बेडसे यांनी नुकसानीची पाहणी केली.
अक्कलकुवा तालुक्यातील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा देवमोगरा पू (मांडवा)येथे सुमारे सहाशे विद्यार्थी शिक्षण घेत आहे, वादळी वाऱ्यामुळे अधिक्षक गृह, कोठी गृह व प्राथमिक व माध्यमिक वर्ग भरत असलेल्या इमारतीचे पत्रे उडालेली आहेत.
त्यामुळे लाखोंचे नुकसान झाल्याच्या प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे आज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे सहाय्यक प्रकल्पधिकारी(शिक्षण) साबळे यांनी नुकसानची पाहणी करून इमारत दुरुस्तीसाठी निधीची तरदूत व मदत पूरविन्यात येणार असे सांगितले, तसेच शालेय प्रवेश प्रक्रिया व इतर परिस्थितीच्या आढावा घेतला.यावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.