शहादा । प्रतिनिधी
शहादा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काल प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली . २ ९ सदस्यांपैकी १५ जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या असून त्यात एक जागा अनुसूचित जाती , दोन जागा अनुसूचित जमाती व १२ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असणार आहेत . ओबीसी आरक्षणाशिवाय हे आरक्षण काढण्यात आले आहे .
शहादा नगरपालिकेच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीसाठी आज लोकमान्य टिळक हॉल येथे प्रांताधिकारी तथा पालिकेचे प्रशासक डॉ . चेतन गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली . पालिकेच्या १४ प्रभागातून २ ९ सदस्य निवडले जाणार आहेत . या २ ९ सदस्यांपैकी १५ जागा या महिलांसाठी आरक्षित असणार असून उर्वरित १४ जागा सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असणार आहेत . सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर पालिकेच्या निवडणुका कधी होणार याबाबत संभ्रमावस्था असली तरी आज निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली . यात ओबीसी आरक्षणाचा समावेश नाही .
असे असेल प्रभागनिहाय आरक्षण –
प्रभाग क्रमांक १ अ- सर्वसाधारण महिला ब- अनुसूचित जमाती प्रभाग क्रमांक २ सर्वसाधारण महिला अ ब सर्वसाधारण गट प्रभाग क्रमांक ३ अ- सर्वसाधारण महिला ब – सर्वसाधारण गट प्रभाग क्रमांक ४ अ- अनुसूचित जाती महिला ब- सर्वसाधारण गट
प्रभाग क्रमांक ५ अ- अनुसूचित जमाती महिला ब – सर्वसाधारण गट प्रभाग क्रमांक ६ अ- अनुसूचित जाती महिला ब- सर्वसाधारण गट प्रभाग क्रमांक ७ अ- सर्वसाधारण महिला ब- सर्वसाधारण गट प्रभाग क्रमांक ८ – अ सर्वसाधारण महिला ब- सर्वसाधारण गट प्रभाग क्रमांक ९ अ – अनुसूचित जमाती महिला ब- सर्वसाधारण गट
प्रभाग क्रमांक १० अ- सर्वसाधारण महिला ब- अनुसूचित जमाती प्रभाग क्रमांक ११ अ सर्वसाधारण महिला ब – सर्वसाधारण गट प्रभाग क्रमांक १२ अ- सर्वसाधारण महिला – ब सर्वसाधारण गट प्रभाग क्रमांक १३ अ – सर्वसाधारण महिला ब- सर्वसाधारण गट प्रभाग क्रमांक १४ सर्वसाधारण महिला अ – ब सर्वसाधारण महिला क- सर्वसाधारण