नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील पिंपळखुटा ते वडफळी रस्त्यावर दुचाकी घसरल्याने एक जण ठार झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील जुने धडगाव येथील दिनेश सुंदर वळवी हे दुचाकीवर एका जणास बसवून पिंपळखुटा ते वडफळी रस्त्याने जात होते.
यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात दुचाकी चालवून मोकस गावाच्या पुढे दुचाकी घसरल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात दिनेश वळवी ठार झाला तर दुचाकीमागे बसलेल्या एकास दुखापत झाली.
याबाबत भिमसिंग सुंदर वळवी यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात मयत दिनेश वळवी याच्याविरोधात भादंवि कल ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक युवराज रावताळे करीत आहेत.