धडगांव l प्रतिनिधी
तालुक्यातील उमराणी खुर्द येथील रहिवासी जेरमल्या लुल्या पावरा यांच्या घराला अचानक आग लागली असुन आगीत घरातील ठेवलेल्या संसार उपयोगी वस्तु जळुन राख झाल्याची घटना घडली आहे.
मान्सूनच्या सुरवातीलाच जेरमल्या पावरा यांचे घर जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने यात जीवित हानी टळली आहे. घरावरील लाकडी दांड्या जळाली व कौल खाली पडून नुकसान झाले.
प्रथम दर्शीनी दिलेल्या माहिती नुसार घरातील सर्व लोक शेतात काम करत असतांना अचानक घरातुन धुराचे लोळ उठल्याचे आजुबाजुच्या नागरिकांना दिसले.
घराला आग लागल्याचे कळताच परिसरातील नागरीक मिळेल त्या भांड्यात पाणी घेऊन आग विझवण्यासाठी धाव घेतली व शर्तीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.
आगीत घराचे अर्धे छत, गुरांसाठी असलेला चारा जळून राख झाले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.प्रशासकीय पातळीवरून सदर नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.