मुंबई l प्रतिनिधी
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या तब्येतीसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. डॉ.प्रकाश आमटे यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ब्लड कॅन्सरचे निदान झाले आहे. त्यासाठी पुढील तपासण्या सुरू असल्याची माहिती मुलगा अनिकेत आमटे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
डॉ . प्रकाश आमटे यांच्या बद्दल एक मोठी वाईट बातमी समोर येत आहे . डॉ . प्रकाश आमटे यांनी समाजासाठी आपले आयुष्य झिजवले आणि आता आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांना ब्लड कॅन्सर चे निदान झाले असून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे .
हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सर त्यांना झाला आहे . त्यांना आधी न्यूमोनियाचे निदान झाले . त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना कॅन्सरचे देखील निदान झाले . न्यूमोनिया बरा झाल्यावर त्यांच्यावर 2-3 आठवड्यानंतर कॅन्सर संबंधित उपचार केले जाणार आहेत .