नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त केंद्र सरकारच्या वित्त विभागाच्या सूचनेनुसार सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे आज शहादा येथे क्रेडिट आउटरीच कार्यक्रमातंर्गत महिला स्वंय सहायता बचतगट ऋण वाटप मेळावा संपन्न झाला.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मनीषा खत्री, तहसिलदार मिलिंद कुळकर्णी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पुणे विभागाचे सहायक महाव्यवस्थापक उदय शंकर जी, नाशिक विभागाचे रिजनल व्यवस्थापक रणजीत सिंह, गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर,
वरिष्ठ व्यवस्थापक नाशिक सचिन ढोके, श्रीमती जयश्री पाडुळे , किरण सवांदे, संभाजी घोटेकर तसेच सेन्ट्रल बँकेचे अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्रीमती. खत्री म्हणाल्या की, बचतगटाना मंजूर केलेल्या कर्जाचा योग्य विनियोग करुन बचतगटांनी कर्जांची नियमित परतफेड करावी. सर्व गटांनी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री व मान्यवराच्या उपस्थितीत 301 बचत गटांना 18.06 कोटीचे कर्ज मंजूरीचे धनादेशाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास महिला स्वंय सहायता बचत गटांचे सभासदही मोठ्या संख्येने उपस्थित होते.