शहादा l प्रतिनिधी
शहरासह परिसरात सायंकाळी साडेपाच वाजता विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली.या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला दीड तास झालेल्या या पावसामुळे .नवीन वसाहतींमध्ये व रस्त्यांवर ठीक ठिकाणी पाणी साचले.
गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने उष्णतेने नागरिक हैराण झाले होते. त्यातच दोन दिवसांपासून पाऊस हुलकावणी देत होता आज मात्र अचानक सायंकाळी पाच वाजेपासून वादळी वाऱ्यांसह जोरदार हवा सुरू झाली होती.
पावसाचा अंदाज नसतांना साडेपाच वाजता पावसाला सुरुवात झाली दिड तास पाऊस झाल्याने रस्त्यांवरून पाणी वाहत होते विविध वसाहती व बाजार चौक, भाजी मार्केट ,प्रेस मारोती मैदान आदी ठिकाणी पावसाचे पाणी साचले सर्वच.वादळीपावसामुळे व्यावसाईकांची धावपळ उडाली.
तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.पहिल्या पावसातच नवीन वसाहतीमध्ये सर्वत्र पाणी असल्याचे दिसून आले.