नवापुर | प्रतिनिधी
नवापुर पोलीसांनी अवघ्या २४ तासातच गुन्हा उघडकीस आणुन संशयीत आरोपीसह ५३ हजार ८२४ रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१० जून रोजी हन्नान रहेमान शेख रा. मुसलमान मोहल्ला, नवापुर यांचे नवापुर शहरात बसस्थानक जवळ अमिन मोबाईल एम.आय. स्टोअर नावाचे मोबाईलचे दुकान असुन सदर फिर्यादी यांनी मोबाईल व मोबाईल साहित्याचा एक पुठ्याचा बॉक्स दुकानात टेबलावर ठेवलेला होता.
सदर मोबाईल व पुठ्याचा बॉक्स अज्ञात चोरट्याने बसस्थानकजवळ असलेले अमिन मोबाईल एम.आय. स्टोअर नावाचे दुकानातुन चोरुन घेवुन गेले होते. याबाबत नवापुर पोलीसठाण्यात फिर्याद दिली असता.
पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील,अपर पोलिस अधिक्षक पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार दादाभाई वाघ यांच्याकडे दिला असता,
त्यांनी गुन्ह्याचे चक्र जलद गतीने फिरवुन अधिकची माहीती काढुन गुन्ह्याचा छडा लावला. नवापुर येथुन संशयीत आरोपीतास ताब्यात घेवून त्यांच्याकडुन ५३ हजार ८२४ रुपये किंमतीचे चोरीला गेलेले मोबाईल वमोबाईल साहित्य जप्त केला आहे.
सदर कारवाई पोलीस हवालदार दादाभाई वाघ, नितीन नाईक, विनोद पराडके, संदीप सोनवणे अशांनी केलीअसुन गुन्ह्याचा पुढिल तपास पोहेका दादाभाई वाघ हे करीत आहेत.