Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शॉक लागून वायरमनचा मृत्यू, संतप्त जमावाकडून वीज वितरण कार्यालयाची तोडफोड

team by team
June 12, 2022
in क्राईम
0
शॉक लागून वायरमनचा मृत्यू, संतप्त जमावाकडून वीज वितरण कार्यालयाची तोडफोड

शहादा l प्रतिनिधी

शहादा शहराला लागून असलेल्या मोहम्मद पोल्ट्री लगत गरपालिकेच्या कचरा डेपो जवळ अनरद ए. जी. येथे वीज वितरण कंपनीचा इलेक्ट्रिक पोल वर काम करीत असताना वरील मेन लाईनची वायर वायरला लागल्याने खाजगी कर्मचाऱ्याच्या शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी अकरा वाजेच्या दरम्यान घडली.

कर्मचारी काम करीत असताना त्याच्या जवळ कोणीही वायरमन किंवा इतर कर्मचारी उपस्थित नव्हता. याप्रकरणी नातेवाईक आणि समाजबांधवांनी महावितरण कार्यालयावर धडक दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेबाबत वरिष्ठ स्तरावर चौकशीकरण्याचे आश्वासन दिल्यानंतर सुमारे पाच तासांनंतर मयत दीपक पाटील यांचा मृतदेह म्हसावद ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पोलिसांनी वेळीच जमावावर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला.

विजेच्या खांबाच्या बाजूला असलेल्या मेन लाईनच्या तारेला स्पर्श झाल्याने वर्डे टेंबा येथील ३२ वर्षीय दीपक पाटील या खाजगी कर्मचाऱ्याच्या विजेचा धक्का लागला. त्यात तो खांबावरून खाली कोसळल्याने जखमी झाला. विजेचा धक्का लागून खाली पडल्यावर दोन तास युवक घटनास्थळावर जखमी अवस्थेत पडून होता.

त्याला एका व्यक्तीने खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती नातेवाईक व गावकऱ्यांना मिळाल्याने ते शहादा महावितरण विभागाच्या कार्यालयावर धडकले. शेकडोच्या संख्येने जमाव असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी महेश घोगरे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले.

वातावरण निर्माण झाले होते. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता भूषण जगताप, तिरुपती पाटील, साहाय्यक अभियंता सुजित पाटील आणि पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले. याबाबत चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तब्बल चार तासांनंतर नातेवाइकांनी मृतक दीपक पाटील यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

असा असेल तुमचा आजचा दिवस : १२ जून राशिभविष्य

Next Post

वृक्ष उन्मळून पडले मोटरसाकलस्वारावर ,जखमीला केले रुग्णालयात दाखल

Next Post
वृक्ष उन्मळून पडले मोटरसाकलस्वारावर ,जखमीला केले रुग्णालयात दाखल

वृक्ष उन्मळून पडले मोटरसाकलस्वारावर ,जखमीला केले रुग्णालयात दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add