नंदुरबार l प्रतिनिधी –
नंदुरबार शहरातील अंधारे चौकात एका खाजगी ट्रॅव्हेल्स मधुन १२ तलवारी जप्त करण्यात आल्या असुन अप्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदरची कारवाई नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , नंदूरबार शहरातील डॉ . अंधारे हॉस्पिटल परिसरातुन एका खाजगी ट्रॅव्हेल्स मधुन ५ मोठ्या व २ लहान अशा एकुण ११ तलवारी जप्त करण्यात आल्या . या तलवारींची किंमत ६ हजार ६०० रुपये आहे .
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सदर कारवाई केली .११ तलवारी पैकी नंदुरबारला 3 तळोदा व अक्कलकुवा शहरात प्रत्येकी १ तलवार नेल्या जाणार होत्या.
पोकॉ . आनंदा पावबा मराठे यांच्या फिर्यादीवरुन
गणेश ईश्वर सोनार , खुशाल काशिनाथ हिरणवाळे दोन्ही रा.नंदुरबार यांच्याविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४ चें उल्लंघन २५ सह मुंबई पोलीस कायदा कलम ३७ ( १ ) ( ३ ) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास एपीआय मोहिते करीत आहेत .