नंदूरबार l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 पिंपळनेर चौफुली जवळ चार चाकी वाहन जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.सदर वाहन गुजरात राज्यातील असून कारला आग नेमकी कशी लागली हे कारण गुलदस्त्यात आहे दरम्यान याप्रकरणी नवापूर पोलीस अधिक तपास करीत आहे.
महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नवापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील नवापूर येथील पिंपळनेर चौफुली जवळ गुजरात राज्यातील कार आगीत जळून खाक झाली आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार सदर कार जवळ दोन गटांमध्ये वाद सुरू होता त्यानंतर कारला आग लागली.कारला आग नेमकी कशी लागली हे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.कारला लागलेल्या आगीची दाहकता बघून शेजारील नयी होंडा परिसरातील नागरिक व शिवसेनेचे पदाधिकारी दर्पण पाटील,
गोविंद मोरे, मनोज बोरसे यांनी नवापुर नगर परिषद अग्निशमन दलाला फोन करून नवापुर पोलिसांनाही माहिती दिली. मात्र अग्निशमन दलाचा बंब येईपर्यंत कार जळून खाक झाली होती. नवापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे.