Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षणाचे आयोजन

team by team
August 11, 2021
in सामाजिक
0

नंदुरबार ! प्रतिनिधी

दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र मिरज संस्थेमार्फत सन 2021-2021 या वर्षांसाठी संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षणासाठी दिव्यांग व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
या संस्थेमार्फत किमान आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन वुईथ एम. एस. ऑफिस (संगणक अभ्यासक्रम) आणि किमान नववी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोटार ॲण्ड आर्मेचर रिवायडिंग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज (इलेक्ट्रीक कोर्स ) करिता प्रवेश दिला जातो.
प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष आहे. प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्याचा असून प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय राहील. अद्ययावत परीपूर्ण संगणक कार्यशाळा, व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, नेटवर्कींग व इंटरनेट आणि मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध आहे. प्रशिक्षणार्थींना समाज कल्याण विभागामार्फत स्वयंरोजगारासाठी बीजभांडवल योजनेचा लाभ देण्यात येईल.
प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसून प्रवेश अर्ज परिपूर्ण भरून छायाचित्रासह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरून द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ज्ञ समितीद्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल.
प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, ता.मिरज, जि. सांगली पिनकोड 416410 (दूरध्वनी क्रमांक 0233-2222908) येथे संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त दिव्यांगानी या योजनेचा लाभ घ्यावा असे संस्थेच्या अधिक्षकांनी कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात आज अखेरचा रुग्णही झाला कोरोनामुक्त, आता जिल्ह्यात एकही रुग्ण नाही

Next Post

ई-पीक पाहणीत’ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा-महेश पाटील

Next Post
ई-पीक पाहणीत’ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा-महेश पाटील

ई-पीक पाहणीत’ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा-महेश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

May 8, 2026
जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

May 8, 2026
कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

May 8, 2026
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्याकडे अध्यक्ष म्हणून राज्यस्तरीय समितीची धुरा

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्याकडे अध्यक्ष म्हणून राज्यस्तरीय समितीची धुरा

May 8, 2026
विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add