नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील कुढावद येथे सांडपाण्याच्या नालीत घाण का टाकले असे विचारल्याच्या रागातून पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील कुढावद येथील संगिता मराठे यांनी सांडपाण्याच्य नालीमध्ये घाण टाकली. याबाबत राधेशाम शंकरलाल जयस्वाल हे सांगण्यासाठी गेले.
याचा राग आल्याने राधेशाम जयस्वाल यांना किशोर नारायण मराठे विटेने पायावर मारुन दुखापत केली. वैभव छोटूलाल मराठे काठीने पाठीवर मारहाण केली. यशराज किशोर मराठे, धनराज किशोर मराठे यांनीही हाताबुक्यांनी मारहाण केली.
तसेच राधेशाम जयस्वाल यांच्या पत्नीलाही किशोर मराठे व संगिता मराठे यांनी हातावर व कानावर मारहाण केली व शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत राधेशाम जयस्वाल यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.रामदास पावरा करीत आहेत.