Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कारवाई करायला गेलेल्या वनविभागाच्या पथकावर हल्ला, दगडफेकीत वाहनाचे नुकसान, वनरक्षक जखमी

team by team
June 9, 2022
in क्राईम
0
कारवाई करायला गेलेल्या वनविभागाच्या पथकावर हल्ला, दगडफेकीत वाहनाचे नुकसान, वनरक्षक जखमी

नवापूर l प्रतिनिधी

तालुक्यातील बारी येथे अवैध लाकुड कारखान्यावर कारवाईसाठी गेलेल्या वनविभागाच्या वाहनांवर ग्रामस्थांनी दगडफेक केल्याने एक कर्मचारी जखमी झाला असून शासकीय वाहनांचे नुकसान झाले आहे. या कारवाईदरम्यान, 50 हजार रुपये किमतीचे सागवानी लाकूड व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सहाय्यक वनसंरक्षकांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून नवापूर, चिंचपडा येथील वनक्षेत्रपाल व गस्तीपथकाने बारी ता.नवापूर या गावातील कमलेश बुध्या कोकणी याच्या घराची झडती घेतली. त्यात 3 साग चौपाट, 2 दरवाजे फालके व एक डिझाईन मशीन मिळून आले. सदर मुद्देमाल शासकीय विक्री आगार नवापूर येथे पावतीने जमा केला.

सदर कारवाईदरम्यान बारी गावातील 60-70 महिला व पुरुषांच्या जमावाने एकत्रित येऊन कारवाईत अडथळा निर्माण केला. अचानक एक अज्ञात इसमाने शासकीय (वाहन क्र.एम.एच.39-0319) वर दगडफेक केली. यात वाहनाच्या मागची काच फुटली. व गाडीजवळ उभे असलेले वनरक्षक बिलाल रेहमान शहा यांना हाताला दगड जोरात लागून मुक्का मार लागला. तसेच सदर दगड(विट) व गाडीचे काच त्याच्या हाताला लागल्याने रक्तस्राव सुरू झाला.

सदर परिस्थितीचा अंदाज घेत सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार यांनी सदर जमावाची समज काढत बारी गावातून स्टाफ व जप्त मुद्देमाल नवापूर विक्री आगार येथे आणला. वनपाल वडकळंबी यांनी गुन्हा नोंद केला.

जखमी वनरक्षक याच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार घेण्यात आले. वनविभागाने, नवापूर पोलिस स्टेशन येथे शासकीय वाहनवर दगडफेक, शासकीय कामात अडथळा, वन कर्मचारी याच्यावर दगडफेक, शासकीय मालमत्ता नुकसानीबाबत फिर्याद दाखल केली. सदर मालाची बाजार भावानुसार अंदाजीत किंमत 50 हजार रुपये आहे.

कारवाइत धनंजय ग.पवार, वनक्षेत्रपाल श्रीमती स्नेहल अवसरमल, वनपाल सुनीता पाटील वनरक्षक कल्पेश अहिरे, तुषार नांद्रे, भूपेश तांबोळी, भानुदास वाघ, बिलाल शाह, कमलेश वसावे, किसन वसावे, अरविंद निकम, प्रतिभा पवार, पुनम सोनवणे, नयना हडस, वाहन चालक – एस.एस. तुंगार, चामार्‍या गावित आणि दिलीप गुरव, वनमजूर-यांनी सहभाग भाग घेतला.

वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

20 व्या राष्ट्रीय अथेलेटिक्स स्पर्धेत नंदुरबारच्या प्रतीक पिंगळेला कांस्यपदक

Next Post

‘बार्टी’मार्फत यूपीएससी पूर्वतयारी प्रशिक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत १०० ने वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add