नंदुरबार l प्रतिनिधी
स्टेट बँक ऑफ इंडिया नंदुरबार शाखेत पगार खाते असलेल्या मृत कर्मचाऱ्याच्या नातलगांना क्लेम रकमेचे वितरण मान्यवरांच्या उवस्थितीत करण्यात आले.
कै.करणसिंग चुलीया गावित यांचे दुदैवाने दि २ डिसेंबर २०२१ रोजी दोंडाईचा – नंदुरबार रस्त्यावर अपघाती निधन झाले. चरणसिंग हे रेल्वे पोलीस फोर्स दोंडाईचा येथे कार्यरत होते.
त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटूंबिय बँकेत खाते बंद करण्यासाठी आले असता स्टेट बँकेतील अधिकाऱ्यांनी हे खाते सॅलरी पॅकेज अंतर्गत असल्याने त्याला विमा संरक्षण असते, अशी माहिती त्यांना दिली व त्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले.
त्याप्रमाणे त्यांच्या वारसांनी कागदपत्रे आणली असता त्यांना सॅलरी पॅकेजया योजनेअंतर्गत 30 लाख विमा संरक्षक रक्कम दि . 27 मे 2022 रोजी त्यांच्या पत्नी श्रीमती काचनाबाई चरणसिंग गावीत यांच्या खात्यावर जमा करण्यात आली.
स्टेट बँकेच्या या योजनेअंतर्गत कुठलेही शुल्क आकारले जात नाही. या आधीही बँकेने वेगवेगळ्या योजना ग्राहकांना सांगून त्यांचे खाते व त्यांचा फायदा कसा होईल या बाबतीत मार्गदर्शनपर मेळावे आयोजित करून जनजागृती केली आहे .
राबवून दि . 8 जून 2022 रोजी नंदुरबार येथे झालेल्या कार्यक्रमात या रकमेच्या धनादेशाचे वितरण नंदुरबार जिल्हाच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री, आ. डॉ . विजयकुमार गावीत व स्टेट बँकेचे रिजनल मॅनेजर सुरजीतकुमार साह यांचे हस्ते करण्यात आले.
आजादी का अमृत महोत्सव ” या कार्यक्रमात स्टेट बँकेच्या इतरही उपक्रमांची , योजनांची माहीती देण्यात आली . या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री , आ. डॉ . विजयकुमार गावीत , स्टेट बँकेचे रिजनल मॅनेजर सुरजीत कुमार साह यांच्यासह अग्रणी बँकेचे जयंत देशपांडे , नाबार्डचे सहा . महाप्रबंधक प्रमोद पाटील , मुख्य प्रबंधक प्रकाश रणधीर, थुळे, स्टेट बँक बँक नंदुरबारचे मुख्य प्रबंधक राजेश मिश्रा व मान्यवर उपस्थित होते .