खापर l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे रक्तदान शिबीर संपन्न.युवासेना नंदुरबार जिल्हाप्रमुख ललितकुमार जाट यांच्या ३६ वा. वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात ४४ दात्यांनी रक्तदान केले.रक्तदात्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व शिवसेनेच्या वतीने स्मृति चिन्ह देऊन गौरव करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन अक्कलकुवा पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेशचंद्र जैन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करुन करण्यात आले.यावेळी अशोक जैन,लक्ष्मण वाडिले,संजय जैन,भूषण जैन,जगदीश चित्रकथी आदी उपस्थित होते.
नंदुरबार हा आदिवासी व दुर्गम जिल्हा असल्याने येथे असलेला बहुसंख्य आदिवासी समाज रक्तदाना बद्दल अनेक गैरसमज आहेत.त्यामुळे जिल्ह्यात रक्ताचा साठा पुरेसा नसतो.जिल्ह्याभरातील संघटना, रक्तदान ग्रुप,नेते विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करतात.शिबिराच्या माध्यमातून शेकडो लोक रक्तदान करतात,यामुळे जिल्ह्यातील रक्तपेढीत रक्तसाठ्यात मोठी भर पडते.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी भूषण जैन,जगदीश चित्रकथी, श्याम लोहार,वर्धमान जैन, ईश्वर चौधरी,राजेंद्र टाक,प्रकाश नाईक यांच्यासह ललित जाट यांच्या मित्र परिवाराने परिश्रम घेतले.
इतरांनाही आदर्श घ्यावा.-जनकल्याण रक्तपेढी नंदुरबार
याप्रसंगी रक्तसंकलना साठी नंदुरबार येथील जनकल्याण रक्तपेढी ची यंत्रणा आलेली होती.त्यांनी सांगितले की,जिल्ह्यात सिकलसेल, गर्भवती महिला आणि वाढलेल्या अपघाताच्या प्रमाणामुळे रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यात जास्तीच्या तापमानामुळे रक्तदान करण्यासाठी कोणीही तयार होत नाही.अशा परिस्थितित खापर येथे ४४ रक्तदात्यांनी सामजिक कर्तव्य पार पाडले.येथील आदर्श घेऊन प्रत्येक लोकप्रतिनिधिने विशेष दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे.
जर कोणाचे प्राण वाचवण्यासाठी रक्त चढवण्याची आवश्यकता असते.अपघात,रक्तस्त्राव , प्रसवकाळ आणि ऑपरेशन अशा स्थितींमध्ये रुग्णास अत्यधिक रक्तस्त्राव होण्याची अधिक शक्यता असते.अशावेळी रुग्णांना रक्ताची गरज पडत असते . थैलेसिमिया,ल्युकिमिया, हीमोफिलिया यासारख्या विकारांनी पीडित रुग्णांमध्ये वारंवार रक्ताची आवश्यकता पडत असते.अन्यथा त्यांच्या जीवितास धोका पोहचत असतो. यासाठी अशा रुग्णांना रक्त चढवणे अत्यंत गरजेचे असते.आपल्या जिल्ह्यात रक्ताचा जाणवतं आहे.त्यामुळे युवकांनी स्वयंफुर्तीने रक्तदान करावे.जेणे करून अनेकांचे प्राण वाचले.
ललित जाट, जिल्हाप्रमुख शिवसेना नंदुरबार,मा.उपसरपंच खापर