तळोदा l प्रतिनिधी
रयतेचे सार्वभौम राज्य निर्माण करणारे, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त
तळोदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पंचधातू पुतळ्याच्या पंचामृत दुग्धाभिषेक करून अभिषेक सोहळा शिवगर्जना देऊन साजरा करण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयात कार्यक्रमात संपन्य झाला.
यावेळी नगरसेविका तथा उत्तर महाराष्ट्र विभाग महिला रा.कॉ.पा अध्यक्षा सौ.अनिता संदीप परदेशी
.,सोनाली कुणाल पाडवी, जिल्हाउपाध्यक्ष डॉ. रामराव आघाडे, शहर अध्यक्ष योगेश मराठे, बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा नेते संदीप परदेशी,
कृ.उ.बा.स.तळोदा संचालक प्रल्हाद फोके ,शहर संघटक राहुल पाडवी, सहसंघटक मुकेश पाडवी, तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक सेल रा.कॉ. पा.चे आरीफ शेख, अल्पसंख्यांक सेल जिल्हा सरचिटणीस याकूब पिंजारी, शहर उपाध्यक्ष गणेश राणे,नदीम बागवान, गणेश पाडवी, खजिनदार-रा.कॉ.पार्टी तळोदा धर्मराज पवार, युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे,
पत्रकार गणेश मराठे,बोरद युवा नेतृत्व रा.कॉ.पा.कुणाल पाडवी,सोनू सोनवणे,प्रकाश पाडवी,फिरोज बेलदार,नितीन मिस्त्री,दत्तू ठाकरे,शुभम आघाडे सहित पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.