नवापूर l प्रतिनिधी
चितवी, ता. नवापूर जिल्हा परिषद गटासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत रविवारी शांततेत ६९.७७ टक्के मतदान झाले .
दरम्यान आज दि.६ जून रोजी मतमोजनी सकाळी १० वाजेपासुन ८ टेबलवर मतमोजणी करण्यात आली यात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील सुरेश गावित 2319 मतांनी विजयी झाले.
चितवी जि.प. गटात ९ हजार ९७९ स्त्रिया व ९ हजार ४३५ पुरुष मतदार असे एकूण १९ हजार ४१४ मतदार आहेत.पैकी आज झालेल्या पोटनिवडणुकीत चितवी गटासाठी २३ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० ते ५.३० वाजेपर्यंत ६ हजार ६२१ स्त्रिया व ६ हजार ९२४ पुरुष मतदार असे एकुन १३ हजार ५४५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
जिल्हा परिषद चितवी गटासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ६९.७७ टक्के मतदान झाले.नवापुर तालुक्यातील प्रतिष्ठितेची असलेली चितवी गट पोट निवडणूकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील सुरेश गावीत तर अपक्ष उमेदवार रवींद्र नकट्या गावीत हे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
आज दि.६ जून रोजी मतमोजनी सकाळी १० वाजेपासुन तहसील कार्यालयात ८ टेबलवर मतमोजणी करण्यात आली.यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील सुरेश गावीत यांना 7 हजार 624 तर अपक्ष उमेदवार रवींद्र नकट्या गावीत 5 हजार 305 मते मिळाल्याने महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील सुरेश गावित 2319 मतांनी विजयी झाले.