नंदुरबार | प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील असली गणाच्या पोट निवडणुकीसाठी ६३.३१ टक्के मतदान,झाले होते.आज दि.६ जून रोजी तहसिल कार्यालय येथे सकाळी १० वाजेपासुन मतमोजणीस सुरूवात झाली या मतमोजणीत काँगेसच्या सोनिया वळवी 3 हजार 349 मतांनी विजयी झाल्या.दरम्यान पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे.
धडगाव तालुक्यातील असली पं.स. गणासाठी ४ हजार ९६७ स्त्रिया तर ५ हजार १२५ पुरुष असे एकूण १० हजार ९२ मतदार आहेत. पैकी ३ हजार ९२ स्त्री, ३ हजार २९७ पुरूषांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. असली पंचायत समिती गणासाठी एकूण १३ मतदान केंद्रांवर शांततेत ६३.३१ टक्के मतदान झाले.
धडगाव तहसिल कार्यालय येथे सकाळी १० वाजेपासुन मतमोजणीस सुरूवात झाली. या मतमोजणीत काँगेसच्या सोनिया वळवी 3 हजार 349 मतांनी विजयी झाल्या.काँगेसच्या सोनिया सिपा वळवी यांना 4 हजार 616, तर अपक्ष कल्पना मगन वसावे यांना 1 हजार 267 मते मिळाली.
जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के. सी. पाडवी यांच्या स्वतःच्या गावातील निवडणूक असल्याने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे, निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता सार्या जिल्ह्यातील जनतेला लागून होती.
पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. असली गणासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ.चेतनसिंग गिरासे यांची नियुक्ती करण्यात आली होती.