शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील 2021-22 या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपनीत निवड झाली आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अंतीम वर्षातील विविध शाखेच्या विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये वार्षिक चांगले पॅकेजवर कॅम्पस मुलाखती घेऊन निवड झाली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आर.एस. पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव, श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, कुलसचिव दिनेश पाटील व महाविद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.