नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२२ पर्यंत मुदत संपलेल्या ९२ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत जाहीर करण्याकरीता उद्या दि.६ व ७ जून रोजी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
सदर ग्रामसभेसाठी ग्रामपंचायत निहाय प्रभाग रचना अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून संबंधित गावांचे ग्रामसेवक आणि तलाठी सहकार्य करणार असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या कार्यक्रमाप्रमाणे तसेच सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिकामध्ये दि.४ मे २०२२ रोजी दिलेल्या आदेशास अनुसरुन आयोगाने ६ मे २०२२ च्या आदेशाने जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२२ मध्ये मुदत संपलेल्या
ग्रामपंचायती व मे २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायती आयोगाने प्रभाग रचना व आरक्षणाबाबत दि.२९ नोव्हेंबर २०१९ रोजी योग्यरित्या न राबविल्यामुळे
संपूर्ण निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभागांच्या सीमा निश्चित करण्यासाठी कार्यक्रम देण्यात आला होता.
त्यानुसार २७ मे २०२२ रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने नंदुरबार तालुक्यातील जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२२ मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायती व मे २०२२ ते डिसंेबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ९२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रभाग रचना अधिकारी व सहाय्यक प्रभाग रचना अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
९२ ग्रामपंचायतींमध्ये होणार आरक्षण सोडत
अजेपूर, अंबापूर, आष्टे, बालआमराई, बिलाडी, ढेकवद, धिरजगाव, गंगापूर, घोगळगाव, हरीपूर, जळखे, काळंबा, खामगाव, नागसर, नवागाव, पाचोराबारी, रनाळे खुर्द, शिरवाडे, श्रीरामपूर, सुतारे, ठाणेपाडा, टोकरतलाव, उमज, वडझाकण, विरचक, वाघाळे, आर्डीतारा, भांगडा, भवानीपाडा, देवपूर, धुळवद, गुजरभवाली, कोठली, लोय, मंगरुळ, मालपूर, नंदपूर, नटावद, निंबोणी, निमगाव, पावला, राजापूर, शेजवे, शिवपूर, वेळावद,
व्याहूर, वागशेपा, वसलाई, भोणे, चाकळे, इंद्रीहट्टी, वासदरे, दहिंदूले बु., दहिंदुले खुर्द, दुधाळे, फुलसरे, करजकुपे, नळवे बु., नळवे खु., नांदर्खे, नारायणपूर, पिंप्री, सुंदर्दे, उमर्दे बु., धमडाई, होळतर्फे हवेली, खोडसगाव, कोळदे, लहान शहादा, पळाशी, पथराई, पातोंडा, राकसवाडे, शिंदे, वरुळ, वाघोदा, अमळथे, आसाणे, चौपाळे, ढंढाणे, धानोरा, घोटाणे, कानळदे, करणखेडा, खैराळे, कोठडे, ओसर्ली, रजाळे, रनाळा, सातुर्खे, तलवाडे बु., तिसी.