नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार रेल्वे स्थानकावर ताप्तीगंगा एक्सप्रेस रेल्वेगाडीच्या डब्यात एक २० वर्षीय तरूण मृतावस्थेत आढळून आला आहे. या तरूणाचा कशामुळे मृत्यू झाला हे समजु शकले नसून नंदुरबार रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ताप्तीपंगा एक्सप्रेस या रेल्वेगाडीच्या डब्यामध्ये एक २० ते २२ वर्षीय अनोळखी तरूण बेशुध्द अवस्थेत मिळून आला. नंदुरबार रेल्वे स्थानकावर एक्यप्रेस गाडी थांबली असता त्यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून सदर तरूणाला मृत घोषित केले.
त्यामुळे हा मयत तरूण कोण? त्याचा मृत्यू कसा झाला? याबाबत काहीही समजु शकले नाही. मयत तरूण हा रंगाने सावळा, उंची पाच फुट तीन इंच, वाढलेले काळे केस, चेहरा गोल, शरीर मध्यमबांधा, अंगात लाल व ग्रे रंगाचे फुलबाहीचे टि शर्ट, निळया रंगाची जिन्सपॅन्ट या वर्णने आहे.
याबाबत नंदुरबार स्टेशन मास्तर सुभाष सिंह यांनी नंदुरबार रेल्वे पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हे.कॉ. अनिता चौधरी करीत आहेत. मयत तरणाची ओळख पटविण्याचे आवाहन नंदुरबार रेल्वे पोलीसांनी केले आहे.