नवापूर | प्रतिनिधी
चितवी, ता. नवापूर जिल्हा परिषद गटासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत रविवारी शांततेत ६९.७७ टक्के मतदान झाले .दरम्यान उद्या. दि.६ जून रोजी मतमोजनी सकाळी १० वाजेपासुन सुरु होणार असुन त्सासाठी ८ टेबल लावण्यात आले आहे.
चितवी जि.प. गटात ९ हजार ९७९ स्त्रिया व ९ हजार ४३५ पुरुष मतदार असे एकूण १९ हजार ४१४ मतदार आहेत.पैकी आज झालेल्या पोटनिवडणुकीत चितवी गटासाठी २३ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० ते ५.३० वाजेपर्यंत ६ हजार ६२१ स्त्रिया व ६ हजार ९२४ पुरुष मतदार असे एकुन १३ हजार ५४५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
जिल्हा परिषद चितवी गटासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ६९.७७ टक्के मतदान झाले.नवापुर तालुक्यातील प्रतिष्ठितेची असलेली चितवी गट पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील सुरेश गावीत तर अपक्ष उमेदवार रवींद्र नकट्या गावीत हे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.
दोघांमध्ये चुरशीची लढत असुन आज संध्याकाळ पर्यंत दोघांचे भवतव्य मतदान पेटीत बंद झाले.निवडणूक शांततेत पार पडली.यावेळी निवडणूक अधिकारी ,तसेच विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलिस उप.निरिक्षक भुषण बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, अतिरिक्त पोलीस कर्मचारी होमगार्ड,महीला पोलिसांनी चा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
या संपुर्ण निवडणुकीवर उपजिल्हाघिकारी ससप्र नंदुरबार निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती कल्पना निळे-ठुबे यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार मंदार कुलकर्णी,
नायबतहसिलदार जितेंद्र पाडवी लक्ष ठेऊन होते. दरम्यान नवापूर तहसिल कार्यलयात ८ टेबल लावण्यात आले असुन मतमोजनी सकाळी १०वाजेपासुन सुरु होणार आहे.११:३०पर्यत निकाल येण्याची शक्यता आहे.