नंदुरबार | प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील असली पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडले.यावेळी ६३.३१ टक्के मतदान झाले.दरम्यान उद्या दि.६ जून रोजी तहसिल कार्यालय येथे सकाळी १० वाजपासुन मतमोजणीस सुरूवात होणार आहे.
असली पं.स. गणासाठी ४ हजार ९६७ स्त्रिया तर ५ हजार १२५ पुरुष असे एकूण १० हजार ९२ मतदार आहेत. पैकी ३ हजार ९२ स्त्री, ३ हजार २९७ पुरूषांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. असली पंचायत समिती गणासाठी एकूण १३ मतदान केंद्रांवर आज शांततेत ६३.३१ टक्के मतदान झाले.
असली पंचायत समिती गणात अपक्ष कल्पना मगन वसावे व कॉग्रेसच्या सोनिया सिपा वळवी यांच्यात सरळ लढत आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड.के. सी. पाडवी यांच्या स्वतःच्या गावातील निवडणूक असल्याने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे,
या निवडणुकीत कॉंग्रेस कडून सोनिया पाडवी या तरुण उमेदवाराला संधी देण्यात आली असून या निवडणुकीवर जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.
या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपली ताकद अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी लावली असली तरी कॉंग्रेसचे पारडे जड आहे.
मंत्री ऍड.के. सी. पाडवी यांनी आपल्या असली गावातील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर आपल्या वयाचे शतक गाठलेले पालकमंत्री ऍड.के. सी. पाडवी यांचे वडील चांदया पाडवी, आई सोमिबाई व कुटुंबीयांनीही या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे,
या निवडणुकीसाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून आलाउद्या दि.६ जून रोजी या निवडणुकीची धडगाव तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
असली गणातील ११ गावातील १३ बुथमध्ये मतदान करण्यात आले. निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता सार्या जिल्ह्यातील जनतेला लागून आहे.सली गणासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ.चेतन गिरासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.