Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर तालुक्यात वनविभागाच्या कारवाईत ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

team by team
June 5, 2022
in क्राईम
0
नवापूर तालुक्यात वनविभागाच्या कारवाईत ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

नवापूर | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील बोरविहिर, काळंबा येथे वनविभागाने तिन घरांतुुन ५३ साग चौपाट तसेच बारीगाव येथे चारचाकीसह ११ नंग असा एकुन ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि,दि.५ जून रविवार रोजी पहाटे सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार (प्रादेशिक व वन्यजीव) यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून त्यांच्यासह वनक्षेत्रपाल नवापूर प्रादेशिक, क्षेत्रपाल नवापूर रेंज स्टाफसह नवापूर तालुक्यातील गुमान गावीत,कुष्या गावीत, रा.बोरविहिर, दिलीप गावीत व सुभाष रा. काळंबा यांच्या घराची सर्च वॉरंटने झडती घेतली.

त्यात ५३ साग चौपाट नग मिळून आले तसेच बारीगाव महसूल शिवारात एका झोपडी जवळ चारचाकी (जी.जे.१९.१४४८) या वाहनाची तपासणी केली असता, त्यात साग चौपाट ११ नग मिळून आले सदरील वाहन व साग चौपाट नग शासकीय विक्री आगार नवापूर येथे पावतीने जमा केले.

सदर कार्यवाहीत साग चौपाट एकूण नग – ६४ व मारुती सुझुकी अल्टो वाहन असा ३ लाखाचा मुद्देमाल आढळुन आला. सदर कारवाहीत सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव ) नंदुरबार धनंजय ग.पवार व वनक्षेत्रपाल नवापूर श्रीमती. स्नेहल अवसरमल, वनपाल दराडे,वनरक्षक कमलेश वसावे,लक्ष्मण पवार,वाहन चालक एस.एस. तुंगार, दिलीप गुरव, वनमजूर बाळकृष्ण गावीत, अनिल गावीत , दिनेश गावित यांनी सहभाग भाग घेतला.

सदर कार्यवाही ही वनसंरक्षक धुळे दि.वा.पगार ,उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा कृष्णा भवर, विभागीय वनअधिकारी दक्षता,धुळे रेवती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे .

वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर १९२६ वर संपर्क करावा असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार, वनविभाग शहादा यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आदर्शवत विवाह : कोरोनाने पतीचा मृत्युनंतर दिराने दिला जीवनसाथी म्हणून हात

Next Post

असली गणाच्या पोटनिवडणुकीसाठी ६३.३१ टक्के मतदान, सकाळी १० वाजपासुन मतमोजणीस सुरूवात होणार

Next Post
असली गणाच्या पोटनिवडणुकीसाठी ६३.३१ टक्के मतदान, सकाळी १० वाजपासुन मतमोजणीस सुरूवात होणार

असली गणाच्या पोटनिवडणुकीसाठी ६३.३१ टक्के मतदान, सकाळी १० वाजपासुन मतमोजणीस सुरूवात होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add