नवापूर l प्रतिनिधी
नवापूर सोनगढ दरम्यान शासकीय विश्रामगृह येथील कार्यरत कर्मचारी हेमंत किसन जाधव यांचा मोटर सायकलचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे
नवापूर सोनगढ दरम्यान गुजरात राज्यात मिरकोट गावा लगत अज्ञात वाहनांने हिरो कंपनीच्या दुचाकी (एम.एच.३९, ऐ.जी.४४१५ ) ला धडक दिली.
अपघात एवढा भीषण होता की दुचाकी चे अक्षरशः दोन तुकडे झाले.उच्छल पोलिसांनी जाधव यांच्या मोबाईल वरून नवापूर येथे संपर्क साधत दि 3 रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताची माहिती दिली.
भीषण अपघातात दुचाकी स्वार नवापूर येथील शासकीय विश्राम गृह सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी हेमंत किसन जाधव (वय 53) यांचा जागीच मृत्यू झाला होता.
हेमंत किसन जाधव हे मनमिळावू स्वभावाचे व अनेक वर्षा पासून शासकीय विश्राम गृहात सेवा देण्याचे काम करत होते त्याचा अकस्मात मृत्यू ने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.