नंदुरबार l प्रतिनिधी
येथील श्री क्षत्रिय राजपूत समाज समितीच्या वतीने राष्ट्रगौरव हिंदुसूर्य, वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची 482 वी जयंती महाआरती व प्रतिमापूजन कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमातून राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंह यांच्या गौरवशाली जीवनकार्याला उजाळा देण्यात आला.
नंदुरबार शहरातील जुनी भोई गल्लीत श्री क्षत्रिय राजपूत समाज समितीतर्फे काल दि.2 जून 2022 रोजी हिंदुसूर्य वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त महाआरती व प्रतिमापूजन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राजपूत समाजाचे ज्येष्ठ नेते अशोक राजपूत व न्यूज पेपर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यभान राजपूत यांच्या हस्ते वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे करण्यात आले.
तसेच महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेची महाआरती विलासनाना राजपूत, भिमसिंग राजपूत, हेमंतसिंग राजपूत, जितेंद्रसिंग राजपूत, डॉ.नरेंद्र पाटील, मोहितसिंग राजपूत, वामन राजपूत, डी.व्ही.राजपूत, संजयसिंग सिसोदिया, खंडूसिंग राजपूत, मोठाभाऊ राजपूत, दत्तात्रय राजपूत, हरीसिंग राजपूत, सुमानसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी पत्रकार रणजितसिंग राजपूत यांनी मनोगतातून राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंह यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला. याप्रसंगी भरत राजपूत, पी.टी.पाटील, चंद्रकांत राजपूत, चेतनसिंग राजपूत, रत्नदिप पाटील, बाबासाहेब राजपूत, पंकज विलास राजपूत, संदिप राजपूत, सुदर्शन राजपूत, दिलीप राजपूत,
राजेंद्र राजपूत, चंद्रभान राजपूत, निंबा राजपूत, प्रविण राजपूत, मनोज राजपूत, सुनिल राजपूत, राजेंद्र राजपूत, हिम्मतसिंग राजपूत, युवराज राजपूत, विजय राजपूत, शरद राजपूत, कमलेश राजपूत, प्रमोद राजपूत, भुषण गिरासे, योगेंद्र गिरासे, विक्की राजपूत,
अरुण राजपूत, मोहित मदन राजपूत, तुकाराम राजपूत, विनोद राजपूत, दिनकर राजपूत, गुलाबसिंग राजपूत, आनंदा राजपूत, प्रल्हाद राजपूत, राकेश राजपूत, दिपक राजपूत, दत्तात्रय राजपूत, मुकेश राजपूत, प्रेमचंद राजपूत, कांतीलाल राजपूत, भावेश राजपूत,
भिक्कन राजपूत, मयुरेश राजपूत, निलेश राजपूत, चेतन पंडीत राजपूत, प्रफुल्ल राजपूत, दर्शन राजपूत, उमेश राजपूत, धनसिंग राजपूत, भोला राजपूत, लाला राजपूत, हितेश राजपूत, प्रविण लक्ष्मण राजपूत, अमर राजपूत, दिपक राणा, संतोष राजपूत, प्रमोद राजपूत, गणेश राजपूत,
युवराज राजपूत, विनायक राजपूत, कुणाल राजपूत, रोहन राजपूत, देवांग राजपूत, मोनू राजपूत, पियुष राजपूत यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री क्षत्रिय राजपूत समाज समितीचे अध्यक्ष चेतन राजपूत, सचिव जितेंद्र राजपूत, उपाध्यक्ष पवन राजपूत, सुमानसिंग राजपूत, अजय राजपूत, हेमंत राजपूत, दिपक राजपूत आदींनी परिश्रम घेतले.