नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील ११ पोलीस हवालदार यांना सहा . पोलीस उप निरीक्षक या पदावर व १० पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार या पदावर सेवा जेष्ठतेनूसार पदोन्नती देण्यात आली असुन
छोटेखानी कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी स्वतः पदोन्नती झालेल्या पोलीस अमंलदारांना सहा . पोलीस उप निरीक्षक पदाचे एक स्टार व पोलीस हवालदार पदाची फित लावून पोलीस अमंलदारांचे अभिनंदन केले.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस दलातील अमंलदारांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात . दि.३१ मे रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरुन १ पोलीस अधिकारी व १४ पोलीस अमंलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार असल्यामुळे जे अमंलदार वर्षानूवर्षे पोलीस दलात परिश्रम करुन आपल्या पदोन्नतीची वाट पाहत असतात .
अशा पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या पोलीस अमंलदारांची यादी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी मंत्रालयीन कर्मचारी यांच्याकडून घेतली . तसेच रिक्त होणार्या जागेवर पदोन्नतीस पात्र असलेल्या अमंलदारांना तात्काळ पदोन्नती देणेबाबतच्या सूचना मंत्रालयीन कर्मचार्यांना दिल्या .
तसेच पदोन्नतीस पात्र असणार्या अमंलदारांना दि.३१ मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय , नंदुरबार येथील संवाद हॉल येथे उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले होते .
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी पदोन्नती देणार्या संबंधीत शाखेचे नंदुरबार जिल्ह्यातील पदोन्नतीस सेवाजेष्ठतेनुसार पात्र असलेल्या सर्व पोलीस अमंलदारांना पदोन्नती दिलेल्या होत्या .
त्याबाबतची सर्व कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करुन ११ पोलीस हवालदार यांना सहा . पोलीस उप निरीक्षक व १० पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती देण्यात आली .
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील ११ पोलीस हवालदार यांना सहा . पोलीस उप निरीक्षक या पदावर व १० पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार या पदावर सेवा जेष्ठतेनूसार पदोन्नती दिलेली आहे . पदोन्नती झालेल्या जिल्ह्यातील २१ पोलीस अमंलदारांना
छोटेखानी कार्यक्रम आयोजन करुन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी स्वतः पदोन्नती झालेल्या पोलीस अमंलदारांना सहा . पोलीस उप निरीक्षक पदाचे एक स्टार व पोलीस हवालदार पदाची फित लावून पोलीस अमंलदारांचे अभिनंदन केले व पोलीस दलातील पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या .
नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेबरोबरच पोलीस अधिकारी व अमंलदारांचे देखील अडी – अडचणी व समस्या वेळेवेर सोडविल्या जातील तसेच गैर कायदेशीर कृत्य करणार्यांची गय केली जाणार नाही.
पी . आर . पाटील, नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक
यांना मिळाली पदोन्नती
पोलीस हवालदार पदावरून सहायक पोलीस निरीक्षक या पदावर तेरसिंग रेवला वसावे, अनिल किसन कोकणी, शिवदास सुरपा पाडवी, सुरेश तुकाराम चौरे, मोजु झाल्या गावीत, विकास साहेबराव पाटील, प्रमोद गुलाब वंजारी, भानुदास कांतु वसावे, प्रमोद जालु वळवी, अनिल गुलाबराव सैंदाणे, विजय काशिनाथ पवार यांना पदोन्नती मिळाली.
तर पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार या पदावर मेनका सोपा वळवी, संगिता दुर्बनसिंग वळवी, अरूण सुदाम कोळी, जितेंद्र सतिष सुर्यवंशी, विजयकुमार पोपट चौधरी, मनोज भगवान चौधरी, अधिकार पुंजरू बोरसे, रमेश अर्जुन तडवी, साहेबराव दिगंबर गावीत, ज्योती काशिनाथ पाटील यांची पदोन्नती झाली आहे.








