नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील आमलीफळी खापर येथून एका अज्ञाताने अल्पवयीन मुलीस पळवून नेले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील आमळीफळी खापर येथून अज्ञाताने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले आहे.
मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात भांदवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अंकिता बाविस्कर करत आहेत.








