नंदुरबार | प्रतिनिधी
भारतीय किसान सेना शहादा तालुका अध्यक्षपदी किशोर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली
भारतीय किसान सेनेतर्फे जिल्ह्यात विविध नियुक्त्या करण्यात येत आहेत.त्युनसार नंदुरबार येथे शहादा तालुका अध्यक्षपदी किशोर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.जिल्हा अध्यक्ष उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी प्रदेश महासचिव पंडित तडवी, उत्तर महाराष्ट्र संघटक सुरेश जगदेव, विमुक्त भटके सेल जिल्हाध्यक्ष कांतीलाल जाधव, सुभाष नेरकर, नामदेव वळवी, सरपंच नितीन नागरे, गुड्डू राठोड उपस्थीत होते.
दरम्यान यावेळी बळीराम पवार यांची शहादा तालुक्यातील नांदया येथील शाखा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.यावेळी विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच शहादा तालुका अध्यक्ष किशोर पाटील यांचा सत्कार यावेळी प्रदेश महासचिव पंडित तडवी यांनी केला.